श्रीगोंदा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; तीन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 16:19 IST2020-07-31T16:19:18+5:302020-07-31T16:19:47+5:30
श्रीगोंदा शहरातील मुख्य रस्त्यावरील तीन मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ३७ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

श्रीगोंदा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; तीन दुकाने फोडली
श्रीगोंदा : शहरातील मुख्य रस्त्यावरील तीन मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ३७ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
शहरातील दौंड-जामखेड रस्त्यावरील भैरवनाथ मेडिकलचे शटर उचकटून मेडिकलमधील ३५ हजार रुपये रोख रक्कम, १२०० रुपयांची सौंदर्य प्रसाधने, ७०० रुपयांचे कॅटबरीचे बॉक्स असा एकूण ३६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला आहे.
या चोरीबाबत हेमंत हिरडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहरातील शुभम व शिवम या मेडिकलमध्ये देखील किरकोळ चोरी झाली आहे.
आढळगाव येथील सिद्धेश्वर पशुखाद्य हे दुकान फोडून चोरट्यांनी दहा हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे.