शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला पाठिंबा देणाऱ्या बसपाच्या 4 नगरसेवकांचे निलंबन, राष्ट्रवादी काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 15:14 IST

अहमदनगर महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी व बसपा यांच्या पाठिंब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले आहेत.

अहमदनगर - महापौर निवडणुकांमध्ये भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या 4 नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी ही कारवाई केली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्याही 18 नगरसेवकांचे निलंबन केलं जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अहमदनगरमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अन् बसपाच्या नगरसेवकांनी भाजपाला मतदान करुन पाठिंबा दिला होता. त्यांनंतर, या दोन्ही पक्षांवर सोशल मीडियातून मोठी टीका करण्यात आली होती. 

अहमदनगर महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी व बसपा यांच्या पाठिंब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, सेनेला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. त्यावेळी शिवसेनेच्या 24 नगरसेवकांपैकी 23 नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. तर समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी सेनेला पाठींबा दिला. सेनेला एकूण 08 मते मिळाली महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे वाकळे व सेनेचे बाळासाहेब बोराटे असे दोन उमेदवार रिंगणात होते. वाकळे यांना 37 मते मिळाली. त्यात भाजपाची 14, राष्ट्रवादीची 18, बसपा 04 व अपक्ष 01 अशा मतांचा समावेश आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांवर येत्या 4 तारखेला कारवाई करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे, बसपनंतर आता राष्ट्रवादीचेही निलंबन केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

दरम्यान, पवार म्हणाले होते, नगरच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मागितली आहे. पक्षाने आदेश देऊनही निर्णय धुडकावला आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे पक्षाची बैठक 4 किंवा 5 जानेवारी 2019 होईल. या बैठकित कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. शहर जिल्हाध्यक्षांकडे अहवाल मागितल्याचेही त्यांनी सांगितले होते.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMayorमहापौरBJPभाजपाShiv Senaशिवसेना