पारनेरच्या पाणी योजनेचे सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:36+5:302021-04-09T04:22:36+5:30
पारनेर : पारनेर शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी योजना होण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. बुधवारपासून ...

पारनेरच्या पाणी योजनेचे सर्वेक्षण सुरू
पारनेर :
पारनेर शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी योजना होण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. बुधवारपासून जीवन प्राधिकरणने पाणी योजनेसाठी सर्वेक्षण सुरू केले आहे.
पारनेरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन लंके यांनी शहरवासीयांना दिले होते. वावरथ जांभळी येथून मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून ही योजना राबविण्यात यावी, असा प्रस्ताव लंके यांनी मंत्रालय स्तरावर सादर केला होता.
पाणी योजनेसाठी लंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर प्राधान्याने पारनेरच्या पाणी योजनेस चालना मिळाली. आता पाणी योजना सर्वेक्षण सुरू झाले आहे.
जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी योजनेचे सर्वेक्षण सुरू केल्यानंतर आता आमदार निलेश लंके हे सोमवारी या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिकांची मतेही यावेळी जाणून घेण्यात येणार आहेत.