मदारी समाज घरकुलांच्या जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:31+5:302021-08-15T04:23:31+5:30
खर्डा : खर्डा (ता.जामखेड) येथे मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मदारी समाज घरकुल योजनेच्या ...

मदारी समाज घरकुलांच्या जागेची पाहणी
खर्डा : खर्डा (ता.जामखेड) येथे मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मदारी समाज घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी जागेची पाहणी
समाज कल्याण आयुक्त राधाकृष्ण देवाडे, लेखा अधिकारी राहुल गांगुर्डे, समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब देवारे यांनी केली.
मदारी समाजाच्या वस्तीवर जाऊन पाहणी करून त्यांना आश्वासन देत चार दिवसांच्या आत जागेची मोजणी करून व काम सुरू होईल, असे आश्वासन आयुक्त देवाडे यांनी दिले. यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, वैभव जमकावळे, दत्तराज पवार, लोकाधिकार आंदोलन सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अरुण जाधव, प्रवक्ते बापूसाहेब ओव्हाळ, तालुकाध्यक्ष विशाल पवार, सामाजिक कार्यकर्ते लखन जाधव, मच्छिंद्र जाधव, हुसेन मदारी, सरदार मदारी, फकिर मदारी आदी उपस्थित होते.