फरार आरोपीची शरणागती
By Admin | Updated: July 23, 2016 00:12 IST2016-07-23T00:03:10+5:302016-07-23T00:12:50+5:30
अहमदनगर : नितीन साठे खून प्रकरणातील दोषी आरोपी व कोतवाली पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ सदाशिव निमसे हा स्वत:हून पोलिसांत हजर झाला़

फरार आरोपीची शरणागती
अहमदनगर : नितीन साठे खून प्रकरणातील दोषी आरोपी व कोतवाली पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ सदाशिव निमसे हा स्वत:हून पोलिसांत हजर झाला़ सीआयडी पथकाने निमसे याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला प्रथम न्यायदंडाधिकारी वाघ यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़
आरोपीच्या बाजूने अॅड़ केदारनाथ राजेभोसले व अॅड़ जय भोसले यांनी युक्तिवाद केला तर फिर्यादीच्या बाजूने सरकारी वकील लक्का यांनी युक्तिवाद केला़ साठे खून प्रकरणी सीआयडी पोलिसांनी सहा आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र सादर केले आहे़
या घटनेनंतर निमसे मात्र, फरार झाला होता़ साठे याचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला. सीआयडी तपासात पोलिसांच्या मारहाणीतच नितीनचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे़
(प्रतिनिधी)