सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला पोलिसांचा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST2021-02-21T04:40:46+5:302021-02-21T04:40:46+5:30
नगर येथील रहिवासी सुमन काळे हिचा २००७ मध्ये पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीमुळे सुमन काळे हिचा ...

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला पोलिसांचा अर्ज
नगर येथील रहिवासी सुमन काळे हिचा २००७ मध्ये पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीमुळे सुमन काळे हिचा मृत्यू झाल्याचा आक्षेप तिच्या मुलाने घेतला होता. पोलीस तपासात विष पिल्यामुळे काळे हिचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या विरोधात काळे हिच्या मुलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पोलिसांच्या ताब्यात असताना सुमन काळे हिचा मृत्यू झाला असल्याचे नमूद करत आरोपींवर खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावून काळे हिच्या नातेवाइकांना पाच लाखांची भरपाई द्यावी, तसेच सहा महिन्यांत हा खटला निकाली काढावा, असे आदेश नुकतेच दिले आहेत. याच निकालाविरोधात आरोपींनी दाखल केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढत आरोपींना झटका दिला आहे.