कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना आधार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:05+5:302021-07-23T04:14:05+5:30
कोपरगाव : कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना तालुका पातळीवरील विविध योजनाच्या माध्यमातून आधार देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, या मागणीचे ...

कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना आधार द्या
कोपरगाव : कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना तालुका पातळीवरील विविध योजनाच्या माध्यमातून आधार देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, या मागणीचे निवेदन कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी गुरुवारी (दि.२२) तहसलीदार योगेश चंद्रे यांच्याकडे दिले आहे.
मालकर म्हणाल्या, कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या ५० वर्षे वयाच्या आतील २० हजार महिला या निराधार झाल्या आहेत. या महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय धोरण जाहीर करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र स्तरावर कोरोना कुटुंब पुनर्वसन समिती स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेत १५० पेक्षा जास्त एकत्रित आल्या आहेत. या समन्वयाच्या वतीने पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे मागणी केली आहे. महिला बालकल्याण विभागाशी राज्यस्तरावर आमची चर्चा सुरू आहे.
आपल्या तालुक्यातही अशा महिलांच्या उदरनिर्वाह व सन्मानाने जगण्याचा प्रश्न गंभीर असून, तालुकास्तरावरील प्रशासकीय यंत्रणेने तत्काळ पुढाकार घ्यावा. या कामात तालुक्यातील स्वयंसेवी संस्था आपल्यासोबत काम करण्यास तयार आहेत.
निवेदनावर अध्यक्ष संगीता मालकर, उपाध्यक्ष सुधा ठोळे, सल्लागार अँड जयंत जोशी, कल्पना कहार, जे. डी. अंकुश, यू. ए. गंगवाल, जे. डी. हरकल, आर. के. तोरणे, एन. बी. पाटणी, किशोर चोरगे, रवींद्र जगताप, लक्ष्मण सताळे, अमन मणियार, एस. के. पाटणी, एस. डी. कुलथे, ए. के. लव्हाटे, एस. डी. ससाणे, पी. सी. विध्वंस, स्वाती मुळे, चंद्रकला पिंगळे, पूजा जाधव, आशा दीक्षित, उषा निकम, ताई सोनवणे यांच्या सह्या आहेत.