शेतकरी-वारकरी मराठा महासंघाकडून साई संस्थानचे समर्थन
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:29+5:302020-12-05T04:37:29+5:30
यासंदर्भात दहातोंडे यांनी संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांना पत्र दिले आहे. संस्थानने भाविकांना दर्शनासाठी येताना सभ्य पोशाख घालण्याचे विनंतीवजा ...

शेतकरी-वारकरी मराठा महासंघाकडून साई संस्थानचे समर्थन
यासंदर्भात दहातोंडे यांनी संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांना पत्र दिले आहे.
संस्थानने भाविकांना दर्शनासाठी येताना सभ्य पोशाख घालण्याचे विनंतीवजा आवाहन केलेले आहे. मात्र, कुणालाही प्रतिबंध अथवा सक्ती केलेली नाही़ भारतीय संस्कृती, रूढी, परंपरा याच्या जपवणुकीसाठी हे आवाहन करण्यात आले आहे. महिलांच्या कोणत्याही मूलभूत हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर यामुळे गदा येणार नाही, याची काळजी संस्थानने घेतली आहे. दर्शनासाठी परदेशी पाहुणे आले तरी ते आपल्या भारतीय वेशभूषात आनंदाने दर्शन घेतात. ‘अतिथी देवो भव’ हे आपले ब्रीद आहे. ‘सब का मालिक एक’ हे साईबाबांचे बोधवाक्य सर्वांच्या स्मरणात असून, त्याचे अनुकरण सर्व भक्तगण करतात. सर्वांकडून वेशभूषेची माफक अपेक्षा आहे. त्यामुळे कोणीही वेशभूषा तथा पेहराव या विषयावर वाद करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन शेतकरी-वारकरी मराठा महासंघाच्या वतीने दहातोंडे यांनी केले आहे.
कोट
साई संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी वेशभूषेसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. संस्थानने भारतीय वेशभूषा परिधान करून साईमंदिरात दर्शनास येण्याची विनंती केली आहे. ती सक्ती असावी. कारण आपण भारतीय आहोत. भारतीय संस्कृती जपणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. तृप्ती देसाई जे वक्तव्य करीत आहे, ते अतिशय निंदनीय आहे.
-रंजना सावंत, शहराध्यक्ष, महिला आघाडी, भाजप