दिल्लीतील शेतकरी आंदोलनास श्रीगोंद्यातून पाठिंबा
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:47+5:302020-12-05T04:38:47+5:30
श्रीगोंदा : केंद्र शासनाने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी श्रीगोंदा तालुका काँग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी केंद्र ...

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास श्रीगोंद्यातून पाठिंबा
श्रीगोंदा : केंद्र शासनाने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी श्रीगोंदा तालुका काँग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. याबाबतचे निवेदन शुक्रवारी सकाळी येथील प्रभारी तहसीलदार डॉ. योगिता ढोले यांना कामगार नेते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्ली येथे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील शेतकऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन उभे केले आहे. यामध्ये आठ वर्षांच्या लहान मुलापासून ८० वर्षांच्या वृद्ध शेतकऱ्यांचाही समावेश आहे. आंदोलनात युवक-युवतींचेही प्रमाण मोठे आहे. यात आतापर्यंत तीन शेतकरी शहीद झाले आहेत. त्यामुळे शासनाने हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, तालुकाध्यक्ष दीपक भोसले, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, ज्ञानदेव गवते, सतीश मखरे, राजेंद्र लोखंडे, समीर बोरा, प्रशांत गोरे, असीफ इनामदार आदी उपस्थित होते.