शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाठिंबा? अजित पवार म्हणाले उद्या, शुभांगी पाटलांनी आजच घेतली नानांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 19:12 IST

शुभांगी पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आजच भेट घेतली असून यासंदर्भात नानाच मीडियाशी बोलतील. मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचा मला पाठिंबा मिळेल, असे शुभांगी यांनी म्हटले.  

अहमनगर/नाशिक - काँग्रेसनेनाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाल्याचे म्हटले आहे. तर, शुभांगी पाटील यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होईल असेही अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यानंतर आता, शुभांगी पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आजच भेट घेतली असून यासंदर्भात नानाच मीडियाशी बोलतील. मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचा मला पाठिंबा मिळेल, असे शुभांगी यांनी म्हटले.  

नाशिकमध्ये कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिक मतदारसंघात पेच निर्माण झाला आहे. आघाडी म्हणून जागा वाटप करताना औरंगाबाद (विक्रम काळे) ही जागा राष्ट्रवादीकडे तर नाशिक कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. तर, त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्षपणे अर्ज भरला आहे. त्यामुळे, या मतदारसंघात अपक्षांची स्पर्धा लागली आहे. दरम्यान, हा अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे हे फक्त डॉ. सुधीर तांबेच सांगू शकतील असेही अजित पवार यांनी म्हटले. तसेच, या जागेसंदर्भात महाविकास आघाडीचा निर्णय उद्या जाहीर होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक शिक्षक मतदार संघात सत्यजित तांबेंना टक्कर देणाऱ्या शुभांगी पाटील यांनी शेगावात जाऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर झाला असून आता काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी पाटील यांची धडपड सुरू आहे. दरम्यान, काम करणाऱ्याला महाविकास आघाडी संधी देईल, काम करणाऱ्याला जनता संधी देईल, असे विधान पाटील यांनी नाना पटोलेंच्या भेटीनंतर केले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNashikनाशिक