पुरवणी यादी मतदान केंद्रावर
By Admin | Updated: August 1, 2014 00:22 IST2014-07-31T23:25:13+5:302014-08-01T00:22:10+5:30
अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची तिसरी पुरवणी यादी जिल्हा निवडणूक विभागाने गुरुवारी प्रसिध्द केली असून, ही यादी मतदान केंद्रासह तहसील व प्रांत कार्यालयात सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे़

पुरवणी यादी मतदान केंद्रावर
अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची तिसरी पुरवणी यादी जिल्हा निवडणूक विभागाने गुरुवारी प्रसिध्द केली असून, ही यादी मतदान केंद्रासह तहसील व प्रांत कार्यालयात सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे़ राजकीय पक्षांसाठी पुरवणी यादी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले़
विधानसभा निवडणुकीची तिसरी पुरवणी यादी जिल्हा निवडणूक शाखेकडून प्रसिध्द करण्यात आली आहे़ ही यादी जिल्ह्यातील तीन हजार ५६७ मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहे़ नाव नोंदणी केलेल्या मतदारांना आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची माहिती व्हावी, यासाठी ही यादी प्रत्येक तहसील कार्यालयांत पाहावयास मिळणार आहे़ प्रांत कार्यालयातही पुरवणी मतदारयादी उपलब्ध असेल़ फोटोसह पुरवणी यादी प्रसिध्द करण्यात आली असून, निवडणूक शाखेच्या संकेत स्थळावरही ती लवकरच उपलब्ध होणार आहे़
राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे़ मतदारसंघातील माहितीसाठी यंत्रणाही कामाला लागली आहे़ मतदारसंघातील मतदारांच्या यादीची राजकीय पक्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे़ मतदारसंघात किती मतदार आहेत, याची माहिती त्यांना सहज उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे इच्छुकांचे काम सोपे झाले असून, मतदारांनाही त्यांचे नाव यादीत आले किंवा नाही, ते तपासता येणार आहे़ नाव चुकीचे असल्यास ते दुरुस्त करून देण्याचीही व्यवस्था असणार आहे़ याशिवाय नवीन नाव नोंदणीची प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहील़ ज्यांची नावे पुरवणी यादीत नाहीत, त्यांनी फार्म सहा भरून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे़
सैनिकांची यादी
येथील लष्करातील जवानांनी नाव नोंदणी केली आहे़ नाव नोंदणी केलेल्या सैनिकांचीही पुरवणी यादी प्रसिध्द करण्यात आली आहे़ सैनिकांनी आपले नाव यादीत आले किंवा नाही, ते तपासून घ्यावे, असे यावेळी सांगण्यात आले़
कर्मचारी अजूनही उत्तरप्रदेशातच
निवडणुकीसाठी सन २००६ नंतरच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे़ या यंत्रांची शुक्रवारपासून तपासणी सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते़ मात्र ही यंत्र अद्यापही उपलब्ध झाली नाही़ ती आणण्यासाठी कर्मचारी उत्तरप्रदेशमध्ये गेले आहेत़ ते अद्याप आले नसल्याचे सांगण्यात आले़