रविवारी १७४ नवे कोरोनाबाधित
By | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:19+5:302020-12-07T04:15:19+5:30
अहमदनगर: जिल्ह्यात रविवारी १७४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर १७९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. शनिवार, रविवारी सुटी असल्याने ...

रविवारी १७४ नवे कोरोनाबाधित
अहमदनगर: जिल्ह्यात रविवारी १७४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर १७९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. शनिवार, रविवारी सुटी असल्याने चाचण्यांची संख्या कमी झाल्याने बाधितांची संख्याही कमी झाल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८४ आणि अँटीजेन चाचणीत ७० रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (३८), कर्जत (१३), नगर ग्रामीण (१८), पारनेर (१५), संगमनेर (१२), अकोले (९), कोपरगाव (६), नेवासा (१०), पाथर्डी (२०), राहाता (१३), राहुरी (२), शेवगाव (५), श्रीगोंदा (९), श्रीरामपूर (४), जामखेड (२) येथील रुग्णांचा समावेश आहे.
एकूण रुग्णसंख्या ९६३ आतापर्यंत ६२ हजार २९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर १५०९ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ९६३ इतकी आहे.