उन्हाळी नाचणीच्या प्रयोगाला मिळाले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:20 IST2021-04-17T04:20:12+5:302021-04-17T04:20:12+5:30

प्रवीण गोसावी म्हणाले की, खडकी बुद्रुक गावात आदिवासी तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत क्रांतिवीर सेंद्रिय भात उत्पादक गट स्थापन केला ...

The summer dance experiment was a success | उन्हाळी नाचणीच्या प्रयोगाला मिळाले यश

उन्हाळी नाचणीच्या प्रयोगाला मिळाले यश

प्रवीण गोसावी म्हणाले की, खडकी बुद्रुक गावात आदिवासी तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत क्रांतिवीर सेंद्रिय भात उत्पादक गट स्थापन केला होता. यावर्षी उन्हाळी नाचणीचा नावीन्यपूर्ण प्रयोग राबविण्याचे ठरविले. सुरुवातीला साशंकता असल्याने केवळ २५ शेतकऱ्यांनी ९.५ एकर क्षेत्रावर नागलीची लागवड केली. यासाठी विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर येथून फुले नाचणी बियाणे उपलब्ध झाले. प्रथम रोपवाटिकेत रोपे तयार केली. गटाने समूहाने लागवड केली. लागवडीनंतर युरिया ब्रिकेटद्वारे खत व्यवस्थापन करण्यात आले. नंतर निमतेल व कीटकनाशकांची फवारणी करून कीड नियंत्रण करण्यात आले. चांगली वाढ व्हावी म्हणून १९:१९:१९ व सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीदेखील करण्यात आली. दाणे भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ फवारणी झाली.

आत्मा उपप्रकल्प संचालक राजाराम गायकवाड, नाचणी संशोधन केंद्राचे डॉ. योगेश बन, बियाणे पुरवठा करणारे डॉ. सुनील कराड यांच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. स्थानिक शेतकरी नामदेव भांगरे, संदीप भांगरे, लक्ष्मण भांगरे, काळू भांगरे व इतर गटातील सर्व शेतकऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली. उन्हाळी नाचणी शिवारभेटीच्या शेतकरी संवाद कार्यक्रमावेळी मंडळ कृषी अधिकारी गिरीश बिबवे, कृषी पर्यवेक्षक बी.एन. वाकचौरे, कृषी सहायक शरद लोहकरे, यशवंत खोकले व आत्माचे बाळनाथ सोनवणे उपस्थित होते.

................

आता आम्ही दरवर्षी नाचणी करणार आहोत. सुरुवातीला धाकधूक होती. कारण थंडीमुळे रोपांची वाढ हळू झाली. जसजसा उन्हाळा वाढला तसतसे पीक बहरू लागले अन्‌ आमच्या कष्टाचे सार्थक झाले.

-अजित भांगरे, अध्यक्ष

............

१६ नाचणी

Web Title: The summer dance experiment was a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.