अहमदनगर: अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडावी, अशी मागणी करत डॉ़ सुजय विखे दक्षिण लोकसभेचे प्रस्तावित उमेदवार आहेत, अशी माहिती माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर येथे बुधवारी पत्रकारांना दिली.महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर थोरात नगर दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते़ महापालिका निवडणूकीची सर्वस्वी जबाबदारी डॉ़ सुजय विखे यांच्याकडे आहे़ त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहेत़ ते येणाºया लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आहेत़ त्यादृष्टीने ते महापालिका निवडणूक सक्षपणे हातळत असून, काँग्रेसचा विजय निश्चित आहे़ दक्षिणेची जागा काँग्रेसकडे घेण्यासाइठी प्रयत्न करणार का असे पत्रकरांनी विचारले असता सर्व वरीष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरु आहे, असे ते म्हणाले.
सुजय विखे लोकसभेचे प्रस्तावित उमेदवार : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:33 IST