शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससह भाजपलाही हरविण्याचा उद्देश - सुजात आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 05:27 IST

काँग्रेससह भाजपलाही हरविण्याचा आमचा उद्देश आहे. आरएसएसला कायद्याच्या चौकटीत आणायचे आहे आणि वंचितांना त्यांचे न्यायहक्क मिळवून द्यायचे आहेत

 - दिलीप चोखरराहाता (जि. अहमदनगर)  - काँग्रेससह भाजपलाही हरविण्याचा आमचा उद्देश आहे. आरएसएसला कायद्याच्या चौकटीत आणायचे आहे आणि वंचितांना त्यांचे न्यायहक्क मिळवून द्यायचे आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राहाता येथे रविवारी वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या युवा परिषदेपूर्वी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, मी वंचित बहुजन आघाडीचा केवळ कार्यकर्ता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवकांशी संवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा समजावून घेणे, युवकांचे संघटन बांधण्याचे काम करीत आहे. काँग्रेसशी युती होईल की नाही हे सांगणे आता कठीण आहे. लोकसभेच्यावेळी काँग्रेस पक्षाकडून सातत्याने वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची ‘बी’ टीम आहे, असा प्रचार केला होता. आता काँग्रेसने पहिले हे सिद्ध करावे की वंचित आघाडी भाजपाची ‘बी’ टीम आहे किंवा नाही. त्यांनी राजकीय हतलबतेने आरोप केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्या नेत्यांनी भाजपा, शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, त्यांच्याकडे निष्ठा मुळीच नव्हती. आमच्याकडेही औरंगाबाद, सोलापूर, सांगली, विदर्भातील नगरसेवकांचे इनकमिंग सुरू झाले आहे. १२ विद्यमान आमदारांनी वंचित आघाडीकडे मुलाखती दिल्या आहेत. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात निश्चित गडबड आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर वंचितने राज्यातील ४८ लोकसभा उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्र व पुराव्यासह न्यायालयात लढाई सुरू केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा