जामखेड येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:42 IST2018-10-01T16:38:53+5:302018-10-01T16:42:02+5:30
जामखेड येथील कर्जत रस्त्यावरील योगेश अशोक घायतडक (वय २२) या तरूणाने रविवारी सायंकाळी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जामखेड येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
जामखेड : येथील कर्जत रस्त्यावरील योगेश अशोक घायतडक (वय २२) या तरूणाने रविवारी सायंकाळी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्जत रस्त्यावरील अंधारओढा येथे घायतडक यांनी रविवारी स्वत:च्या घराजवळील शेतातील लिंबाच्या झाडाला रविवारी सायंकाळी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. एक तासानंतर जनावरे घेऊन घरी परतणाऱ्या लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर आत्महत्येचा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, राष्ट्रवादीचे नेते शहाजी राळेभात, गणेश डोके यांनी योगेश यास ग्रामीण रूग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. अविवाहित असलेल्या योगेश याच्यामागे आई, वडील, व दोन भाऊ आहेत.
योगेश गेल्या दोन दिवसांपासून चिंताग्रस्त वाटत होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.