राहुरी तालुक्यातील तरूण शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 17:49 IST2018-02-25T17:48:35+5:302018-02-25T17:49:32+5:30
गाडकवाडी येथील अशोक शिंदे (२१ वर्ष) या तरूण शेतक-याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

राहुरी तालुक्यातील तरूण शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : गाडकवाडी येथील अशोक शिंदे (२१ वर्ष) या तरूण शेतक-याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र निश्चित समजू शकले नाही.
पांडूरंग अशोक शिंदे या तरूणाचा मृतदेह गाडकवाडी भागातील इंद्रभान गागरे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आढळून आला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पोलिस प्रशासनाकडून पोलीस नाईक टेमकर यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून घेतला. दुपारपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले होते. सायंकाळी उशिरा पांडूरंग शिंदे याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत पांडूरंग शिंदे याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार होता. पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.