चांदेकसारे परिसरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:50 IST2020-06-19T15:49:12+5:302020-06-19T15:50:08+5:30
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावातील आनंदवाडी येथील एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि.१८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

चांदेकसारे परिसरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे गावातील आनंदवाडी येथील एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि.१८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
नीता रवींद्र माळी (वय २१) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. नीता हिने रहात असलेल्या छपरातील लाकडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मिराबाई गोक्षनाथ रोकडे यांच्या खबरीवरून शुक्रवारी पहाटे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश भताने करीत आहेत.