शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या आवारात मारहाण, चौघांना शिक्षा

By admin | Updated: May 11, 2014 00:54 IST

अहमदनगर : राहुरी येथील न्यायालयाच्या आवारात फिर्यादी असलेल्या जावयास आरोपी असलेल्या सासू,पत्नी, दोन मेव्हणे यांनी मारहाण आणि शिविगाळ केली होती

 अहमदनगर : राहुरी येथील न्यायालयाच्या आवारात फिर्यादी असलेल्या जावयास आरोपी असलेल्या सासू,पत्नी, दोन मेव्हणे यांनी मारहाण आणि शिविगाळ केली होती. या कारणावरून चौघांना राहुरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रा.न. वानवाडी यांनी प्रत्येकी एक महिना कैद आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी सुधीर सुखदेव भालेराव (रा. नागापूर) हा कामानिमित्त राहुरी येथील न्यायालयात गेला होता. तेथे पत्नी मंदा सुधीर भालेराव हिने फिर्यादीविरुद्ध पोटगीचा दावा दाखल केलेला होता. त्यामध्ये पैसे न भरण्याचा राग आल्याने फिर्यादीची सासू चंद्रभागा सूर्यभान पवार, पत्नी मंदा सुधीर भालेराव व तिचे दोन भाऊ रवींद्र सूर्यभान पवार, देविदास सूर्यभान पवार (रा. राहुरी खुर्द) यांनी फिर्यादी सुधीर यास न्यायालयाच्या आवारात शिवीगाळ व लाथाबुक्क्याने मारहाण केली होती. फिर्यादी सुधीर हा जीव वाचविण्यासाठी तत्कालीन न्यायाधीश खेडेकर यांच्याकडे पळाला आणि त्याने हकीकत सांगितली. न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी फिर्याद देण्याचे आदेश दिले. पोलिसांनी फिर्याद दिली नसल्याने फिर्यादिने राहुरी न्यायालयात अ‍ॅड. काकासाहेब तांदळे यांच्यामार्फत खासगी फिर्याद दाखल केली. या प्रकरणामध्ये फिर्यादिची व साक्षीदार जयराम चौधरी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अ‍ॅड. ए.पी. मैड यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून चारही आरोपींना शिक्षा केली. दंडामधील निम्मी रक्कम फिर्यादिस देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)