सूचना - १) साधारणतः आईच्या गरोदरपणामध्ये आईचे मोठी किंवा दंत आरोग्य उत्तम राखण्यास उपायकारक ठरते. - वाक्य कळत नाही, तपासणे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:39+5:302021-03-24T04:19:39+5:30
आधुनिक जगात लहान बालकांना आपण जसे संस्कार देणार त्याचेच अनुकरण ते भविष्यात करणार. म्हणून बालपणीच मुलांना दंत आणि मौखिक ...

सूचना - १) साधारणतः आईच्या गरोदरपणामध्ये आईचे मोठी किंवा दंत आरोग्य उत्तम राखण्यास उपायकारक ठरते. - वाक्य कळत नाही, तपासणे.
आधुनिक जगात लहान बालकांना आपण जसे संस्कार देणार त्याचेच अनुकरण ते भविष्यात करणार. म्हणून बालपणीच मुलांना दंत आणि मौखिक आरोग्याच्या चांगल्या सवयी लावणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य असते. दात किडणे, दुखणे इत्यादी रोग लहान मुलांना अनेकदा भेडसावतात. साधारण एक वर्ष वय असताना बालकाचे मौखिक आरोग्याचे प्रश्न उद्भवतात.
बालकांमध्ये दातांना कीड कधी व कशी लागते?
लहान बालकांमध्ये दात किडणे हा संसर्गजन्य रोग ठरतो. त्याचे कारण स्ट्रेप्टोकोकस म्यूटन्स आणि सॅब्रिनस नावाचे सूक्ष्म रोगजंतू बालकात कीड लागण्यास कारणीभूत ठरतात. हा म्यूटन्स नावाचा रोगजंतू बालकांमध्ये आईद्वारे प्रवेश करतो. हा संसर्ग मातेकडून होण्याचा कालावधी विशेषतः बालकाचे वय १९ ते ३१ महिने (म्हणजे दीड ते अडीच वर्षे) असताना अधिक संभवतो. याला जंतुसंसर्गाचा काळ वा विंडो ऑफ इन्फेक्टिविटी म्हणतात. म्हणून या वयोगटात बालकाच्या दंत आरोग्याची विशेष काळजी घेणे उपयुक्त ठरते.
साधारणतः दीर्घकाळ (बराच वेळ) बाटलीने दूध व इतर गोड पेय ज्युस पाजताना किंवा आईचे दूध पिताना दुधामध्ये असलेल्या आणि विघटनात्मक कर्बोदकांमधे वरील रोगजंतूना पोषक वातावरण तयार होते. या वातावरणात सूक्ष्म रोगजंतू दातांवरील आवरणास हानी पोहोचून इनॅमल आवरणाचे विघटन करतात आणि दातांना कीड लागण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेला नर्सिंग बॉटल, बॉटल केरीज किंवा बेबी बॉटल टूथ डीके ही संज्ञा आहे. ही लागलेली कीड अनेकदा अतिशय जलदरीत्या दातांना नुकसान पोहोचविते.
बालकांमध्ये कीड लागणे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
१) बालक लहान असताना पालक, आई-वडील त्यांचे मौखिक आरोग्य निरोगी राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात २) तरीही खूप वेळ तोंडात बाटली ठेवून बालकाला दूध पाजणे टाळावे म्हणजेच ही प्रक्रिया १५ मिनिटांच्या वर नसावी. ३) रात्री लहान मुलाला आईचे दूध पाजणे टाळावे किंवा दिवसा दुधाची सवय लावावी. ४) बालकाला दूध पाजल्यावर एका हातात धरून दुसऱ्या हाताच्या बोटांनी स्वच्छ ओल्या कपड्याद्वारे बालकाचे दात व हिरड्या स्वच्छ करावेत. ५) वयाचे एक वर्ष पूर्ण होण्याच्या दरम्यान बालकाला ग्लास किंवा कपाने पाणी किंवा दूध पिण्यास प्रोत्साहन द्यावे. तसेच १ वर्षापर्यंत बालकाला आईचे दूध पाजावे.
विविध वयोगटांतील बालकांना दंत आरोग्याच्या लावायच्या सवयी
१) साधारणतः आईच्या गरोदरपणामध्ये आईचे मोठी किंवा दंत आरोग्य उत्तम राखण्यास उपायकारक ठरते. गरोदरपणात होणाऱ्या हिरड्यांच्या व दातांच्या रोगावर उपचार व सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर बालकाला जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. २) वयोगट : नुकतेच जन्मलेले बालक ते एक वर्ष वय : या काळात आईने बाळाचे दात व हिरडी दूध पिल्यावर किंवा काही खाल्ल्यावर आपल्या बोटाने ओल्या स्वच्छ फडक्याद्वारे साफ करणे.
३) १ ते ३ वर्षे :
साधारण अंदाज घेऊन पालकांच्या निरीक्षणाखाली आणि प्रोत्साहनाने बालकाला स्वतः मऊ धागे असलेल्या ब्रशने दात स्वच्छ करण्याची सवय लावावी.
दोन वर्षांच्या आसपास अंदाजे शेंगदाण्याच्या आकाराएवढीच टूथपेस्ट देऊन गोलाकार पद्धतीने बालकाला ब्रश करण्याचे मार्गदर्शन करावे. प्रमाणापेक्षा अधिक टूथपेस्ट दिल्यास बालक ती टूथपेस्ट गिळण्याची शक्यता असते.
४) ३ ते ४ वर्षे व नंतर : सकाळी आणि रात्री जेवणानंतर अशा दोन वेळेस शेंगदाण्याच्या आकाराएवढ्याच टूथपेस्टने ब्रश करण्याची सवय लावावी. पिण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यात फ्लुओराईडची मात्रा तपासून ती योग्य प्रमाणात असावी. कारण योग्य प्रमाणात फ्लुओराईड वापरल्याने दातांना कीड लागणे थांबते, तसे नसल्यास फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरावी. या काळात बालकाला बोट चोखण्याची तसेच तोंडाने श्वास घेण्याची सवय असल्यास दंतवैद्याचा सल्ला घेऊनही ही सवय थांबवावी. कारण वरील सर्वांनी दात पुढे येणे, वेडेवाकडे येणे इत्यादी विकार भविष्यात संभवतात. किडलेले दात सिमेंट भरून किंवा नसेचा उपचार करून (Root Canal) करून वाचवावा. विशेषतः दुधाचे दात नैसर्गिकरीत्या पडतील असा प्रयत्न करावा. कारण ठरावीक कालावधीच्या आधी दुधाचे दात काढल्यास त्यानंतर येणारे पक्के कायमचे दात वेळापत्रकात बदल झाल्याने वेडेवाकडे उगवतात आणि भविष्यात त्रासदायक ठरतात.
- डॉ. गोरे सुदर्शन,
गोरे डेन्टल क्लिनिक,
डॉ. आंबेडकर रोड, माळीवाडा.
संपर्क ९०२८३०६०२०