साखर कामगारांना ५ लाखांचे विमा कवच द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:27+5:302020-12-17T04:45:27+5:30
भेंडा : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास राज्यातील साखर कामगारांच्या वारसांना किमान ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी राज्य साखर ...

साखर कामगारांना ५ लाखांचे विमा कवच द्यावे
भेंडा : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास राज्यातील साखर कामगारांच्या वारसांना किमान ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी राज्य साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक व सरचिटणीस नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आदिक यांच्या नेतृत्वाखाली साखर कामगार फेडरशेनच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुंबईत निवेदन दिले. साखर कामगार हा या उद्योगातील अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. सध्या असलेले तुटपुंजे वेतन व थकीत पगारामुळे राज्यातील साखर कामगार मेटाकुटीस आलेला आहे. राज्यात कोविड महामारीने थैमान घातलेले आहे. अनेक साखर कामगार या महामारीचे बळी ठरत आहेत. राज्यात पोलीस, आरोग्य व ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ५० लाखाचे विमा कवच योजनेच्या धर्तीवर राज्यातील साखर उद्योगातील कामगारांचा कोविडमुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना किमान ५ लाख रुपये मदत मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी साखर कामगार फेडरशेनचे खजिनदार डी. एम. निमसे, संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, नेवासा तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष अशोक पवार आदी उपस्थित होते.