साखर कारखान्यांची बिले रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:18 IST2021-05-17T04:18:50+5:302021-05-17T04:18:50+5:30
या प्रश्नी ताके यांनी साखर आयुक्त, तसेच सहकारमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. त्यात त्यांनी नगर जिल्ह्यातील काही कारखान्यांवर नुकत्याच संपलेल्या ...

साखर कारखान्यांची बिले रखडली
या प्रश्नी ताके यांनी साखर आयुक्त, तसेच सहकारमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. त्यात त्यांनी नगर जिल्ह्यातील काही कारखान्यांवर नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात बिले अदा न करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात रुग्ण आहेत. त्यांना उपचारासाठी पैसे उपलब्ध करताना या लॉकडाऊनमधे फार त्रास होत आहे. खरीप उत्पादन अवकाळी पावसाने वाहून नेले, रब्बी हंगामात योग्य हवामान नसल्याने अपेक्षित उत्पादन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकमेव ऊस पिकाकडून आशा होत्या. त्यांचे पैसे किमान जगण्यासाठी तरी उपलब्ध करून द्यावे. चौदा दिवसांत एफआरपी मिळण्याची तरतूद असताना, कायद्याने नाही, तर किमान मानवतेच्या भूमिकेतून शेतकऱ्यांना पैसे अदा करावे, अशी विनंती सुरेश ताके यांनी केली आहे.