साखर @ 13 किलो

By Admin | Updated: July 17, 2014 00:32 IST2014-07-16T23:48:48+5:302014-07-17T00:32:57+5:30

अहमदनगर: दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना अवघ्या १३ रुपयात साखर मिळणार आहे़ नगर जिल्ह्यासाठी पुरवठादारांची बुधवारी आॅनलाईन नियुक्ती करण्यात आली

Sugar @ 13 kg | साखर @ 13 किलो

साखर @ 13 किलो

अहमदनगर: दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना अवघ्या १३ रुपयात साखर मिळणार आहे़ नगर जिल्ह्यासाठी पुरवठादारांची बुधवारी आॅनलाईन नियुक्ती करण्यात आली असून, येत्या जुलैपासून जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना साखरेचा पुरवठा केला जाणार आहे़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकेवरून गायब झालेली साखर पुन्हा मिळणार आहे़
शासनाने फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजना सुरू केली़ त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना अत्यल्प दरात धान्य उपलब्ध होत आहे़ स्वस्त धान्य नागरिकांना मिळाले़ परंतु दारिद्रय रेषेखालील नागरिकांना मिळणारी साखर जानेवारीपासून बंद झाली़ धान्य स्वस्त झाले़ पण साखर गायब झाल्याने शिधापत्रिकेचा गोडवा गेला,असे म्हणण्याची वेळ दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांवर आली होती़ ही साखर विधानसभेतही चांगलीच गाजली़ त्यामुळे सरकारला जागा आली असून, तातडीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी आॅनलाईन बोली लावण्यात आली़ त्यास प्रतिसादही मिळाला़ नगर जिल्ह्यासाठीच्या पुरवठादाराची नियुक्ती आॅनलाईन पध्दतीने करण्यात आली असून, संबंधित ठेकेदाराकडून साखरेचा पुरवठा केला जाणार आहे़
जिल्हा पुरवठा विभागाकडून पूर्वी साखरेचे वाटप करण्यात येत होते़ मात्र साखर कारखान्यांनी शासनास साखर देण्यास नकार दिला़ त्यामुळे साखरेचा तुटवडा निर्माण झाला़ परिणामी शिधापत्रिकेवरून साखर गायब झाली़ साखरेची मागणी करून देखील दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना साखर मिळत नव्हती़ परंतु आता शासनाने पुन्हा साखरेचा पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन निविदा मागविल्या असून, त्यास प्रतिसाद मिळाला आहे़ संबंधित ठेकेदाराकडून येत्या जुलैपासून संबंधित पुरवठादारामार्फत साखरेचा स्वस्त धान्य दुकानांत पुरवठा केला जाणार आहे़ दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे़ (प्रतिनिधी)
साखरेचा पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने आॅनलाईन निविदा मागविल्या होत्या़ नगर जिल्ह्यासाठी बुधवारी आॅनलाईन बोली लावण्यात आली असून, याव्दारे पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे़
-सोपान कासार, जिल्हा पुरवठा अधिकारी
अशी
मिळणार साखर
दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका धारकांना प्रति किलो १३़ ५० दराने साखरेचे वाटप केले जाणार आहे़ प्रति माणसी पाच किलो साखर मिळणार असून, ती सर्व दुकानांत उपलब्ध होणार आहे़तसेच याच दरात अंत्योदय लाभार्थींनाही साखर मिळणार आहे़

Web Title: Sugar @ 13 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.