राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:01+5:302021-09-14T04:26:01+5:30

पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील एकूण महाविद्यालयातून ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते. एम.कॉम वर्गातील अर्चना खेत्रीव भारती ...

Success of Radhabai Kale Mahila Mahavidyalaya | राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे यश

राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे यश

पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील एकूण महाविद्यालयातून ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते. एम.कॉम वर्गातील अर्चना खेत्रीव भारती कदम यांनी अनुक्रमे सहावा व नववा क्रमांक पटकावला. विषयनिहाय गुणवत्ता यादीत ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग ॲॅण्ड कॉस्ट सिस्टीम या विषयांमध्ये अर्चना खेत्री हिने तृतीय क्रमांक, तर काजल कत्रापवार हिने सातवा क्रमांक पटकावला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या या उत्तुंग यशाबद्दल सदर विद्यार्थिनींचे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, उपप्राचार्य प्रा. नासिर सय्यद, उपप्राचार्य रामदास बर्वे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. शुभांगी ठुबे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. इजाज शेख, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवकांनी हार्दिक अभिनंदन केले.

-----------

फोटो - १३ राधाबाई काळे

Web Title: Success of Radhabai Kale Mahila Mahavidyalaya