मुळा प्रवराच्या शेअर्सचा विषय सभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST2021-09-16T04:27:03+5:302021-09-16T04:27:03+5:30
यावेळी संस्थेचे संचालक जलीलखान पठाण, इंद्रनाथ थोरात, सिद्धार्थ मुरकुटे, संजय छल्लारे, ताराचंद तनपुरे, अंबादास ढोकचौळे, तुकाराम बेंद्रे, जिल्हा परिषद ...

मुळा प्रवराच्या शेअर्सचा विषय सभेत
यावेळी संस्थेचे संचालक जलीलखान पठाण, इंद्रनाथ थोरात, सिद्धार्थ मुरकुटे, संजय छल्लारे, ताराचंद तनपुरे, अंबादास ढोकचौळे, तुकाराम बेंद्रे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नानासाहेब शिंदे, माजी सभापती दीपक पटारे, कार्यकारी संचालक जिजाबा करपे उपस्थित होते.
विखे म्हणाले, संस्थेची ३० सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. ही सभा ऑनलाईन आयोजित केली जाणार आहे. संस्थेच्या शेअर्सच्या दरवाढीवरून सध्या चर्चा होत आहे. त्यामुळे काहींना सभासदांचा मताधिकार हिरावून घेतला जाईल अशी भीती वाटते. मात्र त्यात तथ्य नाही. तसा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. मागील निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारे सर्वच सभासद यावेळीही पात्र ठरतील. येत्या सभेत शेअर्सचे मूल्य पुन्हा ५० रुपये करण्याचा विषय मांडणार आहोत.
मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व देण्याची सूचना यावेळी संचालक संजय छल्लारे यांनी खासदार डॉ. विखे यांच्याकडे मांडली. त्यास विखे यांनी संमती दर्शविली. जिल्हा उपनिबंधकांची मान्यता घेऊन तो निर्णय अमलात आणण्याचे त्यांनी यावेळी आदेश दिले. आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीवर भाष्य करण्याचे डॉ. विखे यांनी टाळले. आपण योग्य वेळी भूमिका घेणार आहोत, असे ते म्हणाले. कोविड संकटकाळात नेते मंडळींना येथे लोकांना काय मदत केली ते पाहिले पाहिजे. त्यावेळी कोण मदतीला धावले हे जनतेला माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
--------