प्रदूषण विषयासाठी - नगर शहरातील मैलामिश्रित पाणी नदीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST2021-06-18T04:15:03+5:302021-06-18T04:15:03+5:30
नगर शहरासह उपनगरांतील नागरिकांच्या घरातील मैलामिश्रित व सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंद पाईप गटारींची व्यवस्था करण्यात आली आहे. बंद गटारीद्वारे ...

प्रदूषण विषयासाठी - नगर शहरातील मैलामिश्रित पाणी नदीत
नगर शहरासह उपनगरांतील नागरिकांच्या घरातील मैलामिश्रित व सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंद पाईप गटारींची व्यवस्था करण्यात आली आहे. बंद गटारीद्वारे हे पाणी थेट सीना नदीपात्रात सोडले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा दंड केला आहे. हरित लवादासमोर वेळोवेळी सुनावणी होऊन दंडाची रक्कम वाढविली गेली. महापालिकेने केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. हे काम जलदगतीने सुरू असल्याने जलप्रदूषणाचा विळखा कायम आहे. तसेच जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. या कारखान्यांतून बाहेर पडणारे दूषित पाणीही ओढे, नाल्यांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे कारखाना परिसरात जलप्रदूषण होत असून, याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कार्यवाही सुरू आहे.
.....
एकूण कारखाने
१२००
साखर व मद्यनिर्मितीचे कारखाने
३८
.....
रासायनिक कारखाने
०७