पोलीस उपनिरीक्षक झालेल्यांचा जीवनरक्षक पदकाने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:49+5:302021-03-15T04:20:49+5:30

शेवगाव : येथील आबासाहेब काकडे शिक्षण समूह व जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने पोलीस खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या पोलिसांना ...

Sub-Inspector of Police honored with Life Saving Medal | पोलीस उपनिरीक्षक झालेल्यांचा जीवनरक्षक पदकाने सन्मान

पोलीस उपनिरीक्षक झालेल्यांचा जीवनरक्षक पदकाने सन्मान

शेवगाव : येथील आबासाहेब काकडे शिक्षण समूह व जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने पोलीस खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या पोलिसांना जीवनरक्षक पदक देऊन सन्मान करण्यात अले.

आबासाहेब काकडे शिक्षण संस्थेत पार पाडलेल्या कार्यक्रमात नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी नेमणूक झालेले व सध्या शेवगाव, पाथर्डी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शेखर डोमाळे व योगेश गणगे यांचा सत्कार करून त्यांना जीवनरक्षक पदक देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी जनशक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे होते.

याप्रसंगी सचिन आधाट, अरुण काळे, प्रा. लक्ष्मण बिटाळ, विनोद मोहिते, बंडूभाऊ देहाडराय, शिवाजी कणसे, हरिभाऊ चेडे, राजूमामा फलके, हेमंत पातकळ, आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. काकडे म्हणाले, आपण कष्टाने, जिद्दीने मिळवलेले यश फार मोठे आहे. तुमच्या यशाबद्दल तालुक्याला व आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. तालुक्यातील युवकांनी तुमचा आदर्श घेऊन अशीच उंच भरारी मारली पाहिजे.

उपनिरीक्षकपदी निवड झालेले गणगे म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करून मला घडविले. त्यामुळे येथून पुढे गरिबांचे अश्रू पुसण्याचे काम आम्ही सेवा बजावताना करणार आहोत. अजय नजन यांनी प्रास्ताविक केले. अमोल निकम यांनी आभार मानले.

---

१४ शेवगाव निवड

पोलीस खात्यांतर्गत उपनिरीक्षकपदी निवड झालेल्यांचा शेवगाव येथे सन्मान करण्यात आला.

Web Title: Sub-Inspector of Police honored with Life Saving Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.