विद्यार्थ्यांकडून दुसºया दिवशीही अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 03:43 IST2017-12-04T03:42:58+5:302017-12-04T03:43:18+5:30
येथील आदिवासी वसतिगृहातील मुलांचे उपोषण रविवारी दुसºया दिवशीही सुरूच होते़ निकृष्ट भोजनासह गृहपालाची बदली करण्याच्या मागणीवर मुले ठाम असून

विद्यार्थ्यांकडून दुसºया दिवशीही अन्नत्याग
अहमदनगर : येथील आदिवासी वसतिगृहातील मुलांचे उपोषण रविवारी दुसºया दिवशीही सुरूच होते़ निकृष्ट भोजनासह गृहपालाची बदली करण्याच्या मागणीवर मुले ठाम असून, अधिकारी चर्चेसाठी येणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे़
निकृष्ट भोजन, अपुºया सुविधा आणि दमदाटी करणाºया गृहपालाच्या बदलीसाठी वसतिगृहाच्या प्रांगणातच मुलांनी शनिवारी सकाळी अन्नत्याग आंदोलन सुरू केले़ आदिवासी प्रकल्प विभागाचे कार्यालय अकोल्यात आहे़ त्यांनी दखल न घेतल्याने मुलांनी दुसºया दिवशी नाष्टा, जेवणावरही बहिष्कार टाकला आणि उपोषण सुरूच ठेवले़