विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:20 IST2021-03-19T04:20:36+5:302021-03-19T04:20:36+5:30

शेवगाव : जीवन हे अनमोल आहे. त्याचा सदुपयोग करावा. विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे व पालक, शिक्षक, शाळा, संस्था यांचे ...

Students should choose the area of their choice | विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे

विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे

शेवगाव : जीवन हे अनमोल आहे. त्याचा सदुपयोग करावा. विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे व पालक, शिक्षक, शाळा, संस्था यांचे नाव उज्वल करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी केले.

नुकत्याच झालेल्या जेईईमेन परीक्षेत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पाटील यांच्या हस्ते सन्मान केला. जेईई परीक्षेत रोहित नांगरे याने प्रथम प्रयत्नात ९९.५४ गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. शंतनू फुंदे, सार्थक आरे, रोहित सातपुते, गोविंदा घुले, प्राजक्ता पांगरे हेही चांगले गुण प्राप्त करून परीक्षेस पात्र ठरले.

यावेळी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे शिक्षण समिती प्रमुख प्रा. लक्ष्मण बिटाळ, काकडे विद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत आहेर, प्रभारी प्राचार्य करमसिंग वसावे, निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलचे प्राचार्य गणेश पालवे, कोटा एक्सलन्स सेंटरचे प्रमुख हरीश खरड, प्रा. जितेंद्र मालविया, डायरेक्टर राजेश दारकुंडे, प्रा. शिव अग्रवाल आदी उपस्थित होते.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, जि.प. सदस्या हर्षदा काकडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी कौतुक केले. प्रास्ताविक प्रा. शिव अग्रवाल, सूत्रसंचालन प्रा. रावसाहेब मोरकर यांनी केले. राजेश दारकुंडे यांनी आभार मानले.

---

१८ शेवगाव सत्कार

Web Title: Students should choose the area of their choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.