विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:51+5:302021-03-10T04:21:51+5:30
संगमनेर महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. हरप्रीत पंजाबी, प्रा. लखन लोहिया, प्रा. अंकिता वाघ, प्रा. ऋषिकेश मालाणी, प्रा. रनिता वलवे, प्रा. ...

विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर व्हावे
संगमनेर महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. हरप्रीत पंजाबी, प्रा. लखन लोहिया, प्रा. अंकिता वाघ, प्रा. ऋषिकेश मालाणी, प्रा. रनिता वलवे, प्रा. प्राजक्ता थोरात, प्रा. पी. जी. कांडेकर, बापू सरोदे, किसन मुळे, गुंजन गाडेकर, किरण कदम, विजय क्षीरसागर, हरिभाऊ कुडेकर, रामभाऊ ढवळे उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाचे औचित्यावर ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत मयूर काळे, अस्मिता सातपुते व अमृता बिल्लाडे, साई राहणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.
ग्लोबलच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींच्या गुणवत्ता, वर्तणूक, वागणूक, दृष्टिकोन, शैक्षणिक निकाल अशा निकषांच्या आधारावरून मेघा भवारी या विद्यार्थिनीस ‘स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन मेघा सोनावणे व अस्मिता सातपुते यांनी केले. प्रा. रणीता वलवे यांनी आभार मानले.
फोटो : ०९ केडीमुळे
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील कऱ्हेघाट येथील ग्लोबल एमबी एममध्ये महिला दिनी मेघा भवारी या विद्यार्थिनीचा स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन करण्यात आला.