विद्यार्थ्यांनी अधिकारांबाबत जागरुक होण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:40+5:302021-02-05T06:40:40+5:30
श्रीरामपूर : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये स्वत:चे अधिकार व समानतेबाबत जागरुक होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एन.सलीम यांनी ...

विद्यार्थ्यांनी अधिकारांबाबत जागरुक होण्याची गरज
श्रीरामपूर : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये स्वत:चे अधिकार व समानतेबाबत जागरुक होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एन.सलीम यांनी केले. तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्यावतीने येथील भि. रा. खटोड कन्या विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश सलीम बोलत होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश डी. पी. कासट, न्यायाधीश एस. एम. बोमीडवार, वकील संघाचे अध्यक्ष के. जी. रोकडे, सरकारी वकील प्रसन्न गटणे, हिंद सेवा मंडळाचे सहसचिव अशोक उपाध्ये, डॉ. राजाराम जोंधळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षाविषय नियमांचा अभ्यास करावा. त्यांनी पालकांनाही त्याबाबत अवगत करावे, असे आवाहन न्यायाधीश सलीम यांनी केले. ॲड. तुषार चौदंते यांनी रस्त्यांवरील सूचना फलकांची माहिती दिली. ॲड. शबाना बागवान यांनी बालिका दिनाविषयी माहिती दिली. उपप्राचार्य आबासाहेब कापसे, पर्यवेक्षक विद्या देशपांडे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभांगी गटणे यांनी केले. विजय आगलावे यांनी आभार मानले.
---------