प्रत्येक घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:33+5:302021-07-30T04:21:33+5:30
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकरिता ...

प्रत्येक घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येईल
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकरिता ५० टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या वतीने विखे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजूरकर, प्रदेशाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, भाजपाचे उपाध्यक्ष नितीन कापसे, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष सतीश बावके, किसान आघाडीचे तालुकाप्रमुख बाळासाहेब डांगे, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पलता हरिदास, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक मनोज हिवराळे उपस्थित होते.
विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने या देशातील सामान्यातील सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय केले आहेत. ३४ वर्षांनंतर या देशाला नवीन शैक्षणिक धोरण मिळाले. आज या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणातही प्रत्येक समाजघटकातील विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहात यावा, हाच विचार शैक्षणिक धोरणात आहे. पंतप्रधानांच्या प्रेरणादायी विचारातून प्रवरा संस्थेच्या माध्यमातून मराठा, ओबीस समाजातील विद्यार्थ्यांसाठी फी माफ करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनेचे कार्ड सुपुर्द करण्यात आले.
290721\img-20210729-wa0164.jpg
नव्या शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येक घटकातील विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहात येईलःविखे
५० टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतल्याने विखे यांचा सत्कार