अपघातात विद्यार्थी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 11:01 IST2017-10-16T11:00:45+5:302017-10-16T11:01:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : भरधाव दुधाच्या टँकरने मोटारसायकलस्वारांना धडक दिल्याने एक ठार तर दोनजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ...

अपघातात विद्यार्थी जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : भरधाव दुधाच्या टँकरने मोटारसायकलस्वारांना धडक दिल्याने एक ठार तर दोनजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना संगमनेर ते निमगाव पागा रस्त्यावरील नांदुरी फाटा शिवारात घडली.
सुयोग पंढरीनाथ शेटे (वय 19, रा.नांदुरी दुमाला) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजेंद्र शिवाजी नेहे (वय 18) व सचिन सूर्यभान फरगडे (वय 23) जखमींचे नाव आहेत. तिघेही मोटारसायकलने संगमनेर येथील कॉलेजला गेले होते. कॉलेज संपवून ते तिघेही मोटारसायकलीवरून घरी येत असताना नांदुरी फाटा शिवारात त्यांच्या मोटारसायकलला भरधाव दुधाच्या टँकरने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले.