विद्यार्थी ठार

By Admin | Updated: June 23, 2014 00:05 IST2014-06-22T23:18:29+5:302014-06-23T00:05:41+5:30

श्रीगोंदा : नगर-दौंड रस्त्यावर ढोकराई फाट्यावर झालेल्या मोटार अपघातात शाळकरी मुलगा तौफीक राजू शेख (वय १४) हा जागीच ठार तर तौफीकची आई हसीना राजू शेख ही महिला गंभीर जखमी झाली.

Student killed | विद्यार्थी ठार

विद्यार्थी ठार

श्रीगोंदा : नगर-दौंड रस्त्यावर ढोकराई फाट्यावर झालेल्या मोटार अपघातात शाळकरी मुलगा तौफीक राजू शेख (वय १४) हा जागीच ठार तर तौफीकची आई हसीना राजू शेख ही महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास झाला.
तौफीक शेख व हसीना शेख हे मायलेक मोटारसायकलवरून काष्टीकडे जात असताना समोरून आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली आणि तौफीक शेख हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला आणि हसीना शेख जखमी झाल्या. एकुलता एक मुलगा अपघातात ठार झाल्याचे पाहून आईच्या गगनभेदी आक्रोशाने वातावरण सुन्न झाले. तौफीक हा इंदिरा गांधी विद्या निकेतनमध्ये इयत्ता ७ वीच्या वर्गात शिकत होता. आ.बबनराव पापचुते, राजेंद्र नागवडे यांनी शेख कुुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. (तालुका प्रतिनिधी)
स्वप्न अधुरे़़
हसीनाबार्इंना पतीने सोडचिठ्ठी दिली. एक मुलगा, एका मुलीस बरोबर घेऊन ढोकराईच्या माळरानावर झोपडीत संसार थाटला. गोधडी शिवून मुला-मुलीस शिकविण्याचा संघर्ष चालू असताना एकुलता एक मुलगा अपघातात ठार झाल्याने हसीनाबार्इंचे तौफीकला साहेब बनविण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

Web Title: Student killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.