अकोल्यात एसटी संपात सहभागी झालेल्या एसटी वाहकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 15:34 IST2017-10-18T15:21:11+5:302017-10-18T15:34:57+5:30
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अकोले आगारातील आंदोलनात सहभागी असलेल्या एकनाथ विठ्ठल वाकचौरे (वय ५२, रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांचा बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

अकोल्यात एसटी संपात सहभागी झालेल्या एसटी वाहकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
अहमदनगर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अकोले आगारातील आंदोलनात सहभागी असलेल्या एकनाथ विठ्ठल वाकचौरे (वय ५२, रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांचा बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
वाहक असलेले वाकचौरे यांची एस.टी. महामंडळात २२ वर्षे सेवा झाली आहे. सकाळपासूनच ते आंदोलनात बसून होते. दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नोकरी जाईल, याचा धसका घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. बसस्थानकावजळील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले, मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कामगारांच्या संपाविषयी सरकार उदासीन असल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. दरम्यान एस.टी. संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून कर्मचारीही बसस्थानकात आंदोलन करीत आहेत.