सदृढ शरीर हीच खरी संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST2021-03-18T04:20:21+5:302021-03-18T04:20:21+5:30

निंबोडी (ता. नगर) येथे उभारण्यात आलेल्या जय मल्हार कुस्ती संकुलाचा प्रारंभ माजी मंत्री कर्डिले व माजी जिल्हा परिषद सदस्य ...

A strong body is the real wealth | सदृढ शरीर हीच खरी संपत्ती

सदृढ शरीर हीच खरी संपत्ती

निंबोडी (ता. नगर) येथे उभारण्यात आलेल्या जय मल्हार कुस्ती संकुलाचा प्रारंभ माजी मंत्री कर्डिले व माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी कर्डिले बोलत होते. यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, प्रवीण कोकाटे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, उपमहाराष्ट्र केसरी सचिन यलभर, भाजपचे नगर तालुकाध्यक्ष सरपंच मनोज कोकाटे, दरेवाडी सरपंच अनिल करांडे, निंबोडीचे सरपंच शंकरराव बेरड, संचालक पै.भाऊसाहेब धावडे, भगवानराव भोगाडे, वस्ताद गेणुभाऊ यलभर, काळूराम गवारे, अकोळनेरचे सरपंच अनिल मेहेत्रे, नाना डोंगरे, प्रहार संघटनेचे विनोदसिंग परदेशी उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना, व्यायामाने निरोगी शरीर कमवता येणार आहे. मुलांबरोबर मुलींसाठीदेखील कुस्ती संकुलात सोय करण्यात आल्याचे त्यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन प्रकाश पोटे यांनी केले तर नाना डोंगरे यांनी आभार मानले.

Web Title: A strong body is the real wealth