मुलीची छेड काढल्यामुळे बेलवंडीत दोन गटात तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:24 IST2018-03-28T14:24:33+5:302018-03-28T14:24:50+5:30

बेलवंडी येथे एका मुलीची छेड काढण्यावरून दोन गटात मारामारी झाली. मुलींच्या नातेवाईकांनी रोडरोमियोला चोप दिला. त्याचे कपडे फाडून रोडरोमियोची गावातून धिंड काढण्याचा प्रयत्न केला. 

Strike the girl in two groups in Belvand due to childbirth | मुलीची छेड काढल्यामुळे बेलवंडीत दोन गटात तुफान हाणामारी

मुलीची छेड काढल्यामुळे बेलवंडीत दोन गटात तुफान हाणामारी

श्रीगोंदा : बेलवंडी येथे एका मुलीची छेड काढण्यावरून दोन गटात मंगळवारी मारामारी झाली. मुलींच्या नातेवाईकांनी रोडरोमियोला चोप दिला. त्याचे कपडे फाडून रोडरोमियोची गावातून धिंड काढण्याचा प्रयत्न केला. याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही बेलवंडीत उमटले. बुधवारी दुपारी बेलवंडी बसस्थानकाजवळ दोन्ही गटात धुमश्चक्री झाली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
शिरुर प्रवासादरम्यान एका तरुणाने एका मुलीची छेड काढली. ही माहिती मुलीने घरच्यांना दिली. त्यावर मुलीच्या भावाने संबंधित तरुणाचा शोध घेत मंगळवारी सायंकाळी बेलवंडी बसस्थानकासमोर त्याला सिनेस्टाईल चोप दिला. त्याचे कपडे फाडून गावात धिंड काढण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही.
बुधवारी संबंधित तरुणाच्या नातेवाईकांनी बेलवंडी बसस्थानकासमोर मुलीच्या नातेवाईकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही घटात जोरदार हाणामारी झाली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही गटांना शांत केले. मात्र, सध्या बेलवंडीत तणावग्रस्त परिस्थिती आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणत्याच गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.

Web Title: Strike the girl in two groups in Belvand due to childbirth