आढळगाव शिवारात अट्टल गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST2021-01-13T04:52:36+5:302021-01-13T04:52:36+5:30
श्रीगोंदा : अनेक चोरीच्या गुन्ह्यात हवा असणाऱ्या गणेश शिवाजी काळे (रा. तांदळी दुमाला) या अट्टल गुन्हेगारास श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण ...

आढळगाव शिवारात अट्टल गुन्हेगार जेरबंद
श्रीगोंदा : अनेक चोरीच्या गुन्ह्यात हवा असणाऱ्या गणेश शिवाजी काळे (रा. तांदळी दुमाला) या अट्टल गुन्हेगारास श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आढळगाव शिवारात सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी जप्त केली.
तांदळी दुमाला येथील गणेश काळे याने श्रीगोंदा शहरातून दुचाकी चोरल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस हवालदार अंकुश ढवळे, किरण बोराडे, दादा टाके, संजय काळे, गोकूळ इंगवले, प्रकाश मांडगे यांनी आढळगाव शिवारात सापळा लावला. त्याच दरम्यान आरोपी गणेश काळे हा आढळगाव येथील देवनदी पुलावर आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडील दुचाकी श्रीगोंदा शहरातून चोरल्याची कबुली दिली. काळे याच्या विरोधात श्रीगोंदा, बेलवंडी व कर्जत पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रोहिदास झुंजार करत आहेत. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी केली.