वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन छेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:02+5:302021-02-06T04:38:02+5:30
खंडित विजेमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देणे मुश्कील झाले. वीज येते तेव्हा रात्री अपरात्री शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे ...

वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन छेडणार
खंडित विजेमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देणे मुश्कील झाले. वीज येते तेव्हा रात्री अपरात्री शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. पुढील दोन महिन्यात रब्बी हंगामातील पिके काढणीस येणार असून पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र विजेअभावी पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने पिके जळून चालली आहेत. त्यामुळे दोन दिवसात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तळेगाव दिघे चौफुलीवर सोमवारी (दि. ८) रोजी सकाळी ९ वाजता रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नामदेव सीताराम दिघे, रावसाहेब चांगदेव दिघे, नवनाथ लक्ष्मण दिघे, मधुकर दिघे, दादासाहेब रायभान दिघे, अनिल नवनाथ दिघे, उपसरपंच रमेश सावित्रा दिघे, रवींद्र कान्होबा दिघे, पोपट कारभारी दिघे, अमोल बाळासाहेब दिघे, सुनील दिघे, दीपक तबाजी दिघे, गणेश बोऱ्हाडे, प्रकाश दिघे सहित शेतकऱ्यांनी दिला आहे. याप्रश्नी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो : ०५ तळेगाव
तळेगाव दिघे : वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन छेडू या मागणीचे निवेदन संगमनेर येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देताना तळेगाव दिघे येथील शेतकरी, कार्यकर्ते दिसत आहेत.