शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

केडगावमधील पथदिव्यांची बत्ती ‘गुल’! नगर-केडगाव मार्ग अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 18:08 IST

सुमारे चार कोटींचा कर भरूनही केडगावकरांच्या वाट्याला अंधार आला आहे.केडगाव उपनगरातील विविध वसाहतीत असणारे दिव्यांचे खांब बंद पडून महिने लोटले तरी त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही.नगर-केडगाव मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत.अंधारामुळे अपघाताची भीती वाढली आहे.

योगेश गुंडकेडगाव : सुमारे चार कोटींचा कर भरूनही केडगावकरांच्या वाट्याला अंधार आला आहे.केडगाव उपनगरातील विविध वसाहतीत असणारे दिव्यांचे खांब बंद पडून महिने लोटले तरी त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही.नगर-केडगाव मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत.अंधारामुळे अपघाताची भीती वाढली आहे.सुमारे ८० हजारापेक्षा जास्त लोकवस्ती असणा?्या केडगाव मधून महापालिकेला वषार्ला सुमारे ४ कोटी रुपयांचा कर रूपाने महसूल मिळतो.रखडलेल्या मुलभूत सुविधा योजनेतील कामांशिवाय गेल्या चार-पाच वर्षात केडगाव भागात कोणतेच नाव घेण्याजोगे काम उभे राहू शकले नाही.केडगाव मधील विविध वसाहतीमधील पथदिव्यांची संख्या जवळपास ३ हजारांच्या घरात आहे,मात्र यातील २ हजार दिवे हि सुरु नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत..गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले दिवे सुरु करण्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने अनेक ठिकाणी अंधारातच नागरिक चाचपडत आहेत.आता पावसाळा सुरु होणार असल्याने अंधारात रस्त्यावरील डबके,खड्डे यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.नगर-पुणे राज्यमार्गावर केडगाव पर्यंत रस्ता दुभाजकावर दिव्यांचे खांब लावण्यात आले.मोठ्या थाटामाटात त्याचे उद्घाटन करण्यात आले.मात्र एक-एक करत निम्मे दिवे बंद पडले तरी ते पुन्हा सुरु करण्याकडे महापालिकने लक्ष दिले नाही.रात्रीच्या वेळी राज्यमार्गावर अंधार होत असल्याने अनेक अपघात घडत आहेत.रेल्वे उड्डाणपूल तर नेहमीच अंधारात असतो.अनेक खांबाना वाहनांनी धडक दिल्याने ते रस्तावर वाकडे पडले अआहेत.नागरिकांनाच ते सरळ करावे लागत आहेत.साहित्यच नाही आम्ही तरी काय करूकेडगाव मधील बंद पथदिव्यांची तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना .आम्ही अनेकदा मनपाकडे साहित्य मागतो,पण साहित्यच मिळत नाही मग आम्ही दिवे तरी कसे सुरु करणार, असे उत्तर कर्मचार्यांकडून ऐकावे लागते. मनपाकडे साहित्य नसल्याने केडगाव मधील नागरिक अंधारात चाचपडत आहेत.हे साहित्य कधी येईल आणि कधी केडगावचा अंधार दूर होईल असा प्रश्न नागरिक करत आहेत.‘भाग्योदय’चे खासगीकरण व्हावेवषार्ला लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणारे केडगाव मधील भाग्योदय मंगल कार्यालय मनपाला केडगाव ग्रामपंचायतीकडून आयते मिळाले.मात्र त्याचे नूतनीकरण तर सोडाच पण साधी डागडुजी करण्याची तसदी हि मनपाने कधीच घेतली नाही.मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षाने सुस्थितीत असणारे हे कार्यालय अडगळीत पडले आहे.त्याचे खासगीकरण व्हावे तरच या कार्यालयाचे खरे ह्यभाग्य ह्य उजळेल अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका