अहमदनगर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 19:30 IST2018-06-01T19:30:33+5:302018-06-01T19:30:50+5:30

जिल्हाभर कालपासून मान्सूनपुर्व वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. नगर तालुक्यातील चास, अकोळनेर, सोनेवाडी परिसराला काल सायंकाळी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.

Stormy rain in Ahmadnagar district | अहमदनगर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

अहमदनगर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

अहमदनगर : जिल्हाभर कालपासून मान्सूनपुर्व वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. नगर तालुक्यातील चास, अकोळनेर, सोनेवाडी परिसराला काल सायंकाळी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या वादळात घर, जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडाले. झाडे उन्मळून पडली आहेत. काही शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले असून अनेक पॉलिहाऊस उद्ध्वस्त झाले आहेत. अकोळनेर गावच्या परिसरात अचानक वादळ सुरु झाले. चास गावच्या परिसरातील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या विविध भागात वादळवा-यासह आजही पावसाने हजेरी लावली.

 

Web Title: Stormy rain in Ahmadnagar district