वादळाने केळीची बाग उद्ध्वस्त
By Admin | Updated: June 3, 2014 00:27 IST2014-06-02T23:36:34+5:302014-06-03T00:27:25+5:30
कुकाणा : नेवासा तालुक्यातील देवगाव व परिसरात रविवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान वादळी वार्यासह झालेल्या जोरदार पावसाने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़
वादळाने केळीची बाग उद्ध्वस्त
कुकाणा : नेवासा तालुक्यातील देवगाव व परिसरात रविवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान वादळी वार्यासह झालेल्या जोरदार पावसाने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़ चार महिन्यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप न मिळाली नसतानाच पुन्हा अवकाळी पावसाने शेतकर्यांना जोरदार तडाखा बसला आहे़ देवगाव (ता. नेवासा) येथील प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ आसाराम गायकवाड यांनी यंदा तीन एकरात साडेचार हजार केळी पीक घेतले आहे़ केळीला केळी आल्या आहेत़ त्यांनी खत, पाणी आणि जोपासणीसाठी लाखो रुपये खर्च केला़ मात्र, रविवारी (दि़१) रात्री रोजदार वादळ आणि त्यानंतर झालेल्या पावसाने केळीची झाडे उन्मळून पडली़ गायकवाड यांच्या शेतातील सुमारे साडेचारशे ते पाचशे झाडे मोडून पडल्याने अंदाजे दोन-तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे़ गायकवाड यांचे शेजारी एकनाथ दगडू भुजबळ यांचीही दोन एकरात केळीची बाग होती़ वादळाने भुजबळ यांचीही बाग उद्ध्वस्त झाली आहे़ भुजबळ यांच्या बागेतील केळची झाडे आठ महिन्यांची होती़ ही केळीची झाडे वादळामुळे मधोमध चिरली गेली आहेत़ त्यामुळे त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. या पिकाचे पंचनामे होऊन नुकसान भरपायी मिळावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. (वार्ताहर)तीन एकरात सुमारे साडेचार हजार केळीची झाडे लावून त्यांना मुलाबाळाप्रमाणे नऊ महिने जपले. मात्र रविवारी झालेल्या वादळी पावसाने क्षणातच होत्याचे नव्हते झाले़ लाखो रुपये खर्चून बाग उभी केली होती़ आमच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे़ नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे. -गोरक्षनाथ गायकवाड, नुकसानग्रस्त शेतकरी