शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारद-यातून मिळणार चार आवर्तने; उद्यापासून सुटणार आवर्तन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:38 IST

भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामास एक तर उन्हाळ्यासाठी तीन अशी चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या आऊटलेट गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सुटणारे रब्बीचे आवर्तन पाच दिवस उशिराने म्हणजेच रविवारी किंवा सोमवारी सुटण्याची शक्यता आहे.

राजूर : भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामास एक तर उन्हाळ्यासाठी तीन अशी चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या आऊटलेट गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सुटणारे रब्बीचे आवर्तन पाच दिवस उशिराने म्हणजेच रविवारी किंवा सोमवारी सुटण्याची शक्यता आहे.सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या दोन्ही धरणांमधून सोडण्यात येणा-या पाण्याच्या आवर्तनांचे नियोजन करण्यात आले. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत लाभ क्षेत्रात पाऊस पडल्याने पाण्याची मागणी झाली नव्हती. त्यामुळे दोन्ही धरणांत पाणीसाठा जवळपास जैसे थे आहे. सध्या भंडारदरा धरणात १० हजार ८०३ दशलक्ष घनफूट तर निळवंडे मध्ये ७ हजार ९१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच दोन्ही धरणांमध्ये एकूण १८ हजार ७२१ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे.पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी साठी एका आवर्तनाचे नियोजन करण्यात आले. हे आवर्तन बुधवारी सोडण्याचे नियोजित होते. मात्र निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे गेट कार्यान्वित झाले नाही. यांत्रिकी विभागामार्फत हे गेट दुरुस्तीचे काम सध्या सुरु आहे. दोन दिवसांत हे गेट सुरळीत होईल आणि निळवंडे धरणातून रविवारी किंवा सोमवारी पाणी सोडण्यास सुरुवात होईल, असे जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश हारदे यांनी सांगितले.  या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बीसाठी पाण्याची मागणी तुलनेने कमी आहे. या आवर्तनात सुमारे अडीच ते तीन हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होण्याची शक्यता असून हे आवर्तन २५ दिवस चालण्याचा अंदाज सहायक अभियंता हारदे यांनी व्यक्त केला. रब्बीच्या आवर्तनानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळ्याचे पहिले आवर्तन सुटणार असून त्यानंतर दोन असे उन्हाळ्यासाठी एकूण तीन आवर्तनांचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरwater shortageपाणीकपातFarmerशेतकरीDamधरण