मेंढ्यासह रास्ता रोको
By Admin | Updated: July 27, 2014 01:08 IST2014-07-26T23:23:25+5:302014-07-27T01:08:48+5:30
राहुरी : येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष क रीत धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यांसह नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मेंढ्यासह रास्ता रोको
राहुरी : येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष क रीत धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यांसह नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाने शब्दाची दुरूस्ती करून धनगर समाजाचा अनुसूचित जाती-जमातीमध्ये समावेश करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला़
आंदोलकांपैकी बबन देवकर यांनी मेंढ्यांचा कळप बाजार समितीसमोर आणून आंदोलनात सहभाग नोंदविला़ कपाळाला भंडारा लावून रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात करण्यात आली़ नायब तहसीलदार कदम व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले़
आंदोलकांसमोर गंगाधर तमनर, अण्णासाहेब बाचकर, नानासाहेब मंडलिक, पंढरीनाथ पाटोळे, कृष्णाजी होळनर, संजय तमनर, विजय तमनर, ज्ञानदेव बाचकर, दत्ता खेडेकर यांची भाषणे झाली़
आंदोलनामध्ये सुरेश तमनर, दीपक रकटे, कैलास केसकर, कैलास माने, प्रकाश चिकले, सोमनाथ गवते, गोरक्षनाथ गवते आदी उपस्थित होते़ आंदोलनाला शिवसेनेच्या वतीने सर्जेराव घाडगे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्राजक्त तनपुरे यांनी पाठिंबा जाहीर केला़ आंदोलनामुळे नगर-मनमाड रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़
(तालुका प्रतिनिधी)
लक्ष्यवेधी आंदोलन
आंदोलनादरम्यान मेढ्यांना रस्त्यावर आणल्याने तो एकच कुतूहलाचा विषय ठरला. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष्य या मंढ्या वेधून घेत होत्या. शिवाय या मेंढ्यांना एका जागेवर थांबवण्याची मोठी कसरतही आंदोलकांना करावी लागली. कारण एवढ्या गर्दीत, गोंगाटात मेंढ्या काढता पाय घेण्याचा प्रयत्न करत होत्या.