शेवगावात रास्ता रोको, पेटविले टायर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:10+5:302021-07-02T04:15:10+5:30

शेवगाव : येथील संत गाडगेबाबा चौकातील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीजबिल वसुलीच्या विरोधात विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून ...

Stop the road in Shevgaon, fire tires | शेवगावात रास्ता रोको, पेटविले टायर

शेवगावात रास्ता रोको, पेटविले टायर

शेवगाव : येथील संत गाडगेबाबा चौकातील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीजबिल वसुलीच्या विरोधात विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गुरूवारी सकाळी शेवगाव - नगर मार्गावरील संत गाडगेबाबा चौक येथे भाजपचे सुनील रासने, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, गणेश डोमकावळे, टपरीधारक संघटनेचे कमलेश लांडगे, समीर शेख, भाकपाचे संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत भराट, दत्तात्रय फुंदे, भाऊ बैरागी, नगरसेवक उमर शेख आदींच्या नेतृत्त्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

एक तास रास्ता रोको सुरू होता. त्यानंतर आंदोलकांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शेवगाव शहरासह तालुक्यातील वीज जोडधारकांचे महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी वीज जोड सक्तीने तोडण्यात येत आहेत. कोरोना काळात नागरिकांचा रोजगार बुडाला असूूून, नागरिकांचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झालेला असताना अनेक ठिकाणी चुकीचे रिडिंग

दुरुस्त न करता बिले दिली जात आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना वीजबिलेही दिली जात नाहीत. अनेक ठिकाणी कंपनीचे कर्मचारी अरेरावीची भाषा वापरत आहेत. तसेच चालू थकबाकी असलेल्या ग्राहकांचेही वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू आहे. याबाबत कुठल्याही स्वरूपात न कळविता वीज कनेक्शन तोडली जात आहेत. ही मोहीम तत्काळ थांबवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. महावितरणचे अभियंता एस. आर. लोहारे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी देविदास हुशार, ज्ञानेश्वर कुसळकर, विठ्ठल दुधाळ, सुनील काथवटे, सचिन काथवटे, बाळासाहेब फंटागरे, निवृत्ती आधाट, अशोक भोसले, कैलास शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

----

...तर पुन्हा आंदोलन छेडू

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची सक्‍तीची वीजबिल वसुली थांबवावी, लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण वीजबिल माफ करावे, खंडित केलेला वीज पुरवठा तत्काळ पूर्ववत करावा, ९० टक्‍के वीज बिलात रिडिंग घोटाळा आहे, तो दुरुस्त करावा. याप्रकरणी योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

---------

०१ शेवगाव आंदोलन

शेवगाव येथे रास्ता रोकोप्रसंगी पेटविलेले टायर.

Web Title: Stop the road in Shevgaon, fire tires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.