चांद्यात चोरी : १५ तोळे सोने अन सव्वा किलो चांदी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:44 IST2019-01-31T16:44:35+5:302019-01-31T16:44:48+5:30

चांदा ( ता.नेवासा)येथील मुख्य बाजारपेठेत चोरी झाली असून चोरट्यांनी अंदाजे १५ तोळे सोने सव्वा किलो चांदी रोख रक्कम लंपास केली.

Stolen in the Moon: 15 Tola Gold and Savva Kg Silver Lampas | चांद्यात चोरी : १५ तोळे सोने अन सव्वा किलो चांदी लंपास

चांद्यात चोरी : १५ तोळे सोने अन सव्वा किलो चांदी लंपास

सोनई : चांदा ( ता.नेवासा)येथील मुख्य बाजारपेठेत चोरी झाली असून चोरट्यांनी अंदाजे १५ तोळे सोने सव्वा किलो चांदी रोख रक्कम लंपास केली.
मुख्य बाजारपेठेत सुनिल मनसुखलाल कटारीया यांच्या घरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाची खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात सर्व सामानाची व कपाटाची उचकापाचक करून चोरी केली. यामध्ये पाच तोळे सोन्याचे मणी, दोन तोळे सोन्याच्या बांगड्या, दोन तोळे सोन्याच्या चार चुड्या तसेच चांदीचे कप, बशी, ग्लास, नाणे, चांदीची फ्रेम असे एकूण अंदाजे सव्वा किलो चांदी व दहा हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले.
कटारीया यांच्या दुकाना समोरच असलेल्या वृषभ गांधी यांचे मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. तिसरी घटना पेठेच्या मागील गल्लीत राहणा-या भानुदास नागपुरे यांच्या घरी झाली. कपाटात ठेवलेले आठ ग्रॅम सोन्याचे डोल, रोख पंधरा हजार रुपये चोरट्यांनी लांबविले.
पोलिस पाटिल कैलास अभिनव यांनी घटनेची माहीती सोनई पोलिसांना दिली. सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने घटनास्थळी हजर झाले. घटनेची पाहणी करून त्यांनी तातडीने ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सुनिल कटारीया व भानुदास नागपुरे यांनी सोनई पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Stolen in the Moon: 15 Tola Gold and Savva Kg Silver Lampas