चोरीस गेलेली महागडी दुचाकी विहिरीत आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:24+5:302021-09-17T04:26:24+5:30
वैभव सुनील शेळके (२१, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर, जि. पुणे) याने याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ...

चोरीस गेलेली महागडी दुचाकी विहिरीत आढळली
वैभव सुनील शेळके (२१, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर, जि. पुणे) याने याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तो कामानिमित्त बोटा येथे आपल्या मामाकडे आला होता. त्याच दिवशी रात्री दुचाकी घरासमोरून चोरीला गेली होती. ही दुचाकी पिंपळगाव देपा येथील शेतकरी पांडुरंग उंडे यांच्या विहिरीत आढळून आली. गुरुवारी सकाळी उंडे यांच्या शेतात शेतमजूर काम करत असताना त्यांना विहिरीत दुचाकी तरंगत असल्याचे दिसले. त्यांनी पोलीस पाटील शिवप्रसाद दिवेकर यांना कळविले. दिवेकर यांनी घारगाव पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पांडुरंग उंडे यांनी इतर शेतकऱ्यांच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने दुचाकी विहिरीतून वर काढली व घारगाव पोलिसांच्या स्वाधीन केली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख करीत आहेत.