२० लाख रुपयांचा दारू साठा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:10+5:302021-04-09T04:22:10+5:30
विभागाचे प्रभारी उपअधीक्षक संजय सराफ, निरीक्षक अनिल पाटील, संजय कोल्हे, पी. बी. अहिराव, दुय्यम निरीक्षक के. यू. छत्रे, ...

२० लाख रुपयांचा दारू साठा पकडला
विभागाचे प्रभारी उपअधीक्षक संजय सराफ, निरीक्षक अनिल पाटील, संजय कोल्हे, पी. बी. अहिराव, दुय्यम निरीक्षक के. यू. छत्रे, एम.डी. कोडे, ए. सी. खाडे, डी. वाय. गोलेकर, नंदकुमार परत, एन. आर. वाघ, ए.पी. तनपुरे, विकास कंठाळे आदींनी ही कारवाई केली.
याप्रकरणी दीपक मच्छिंद्र निर्मळ, (रा. निर्मळ पिंपरी, ता. राहता), दीपक भाऊसाहेब पारधी (रा. जांबूत, ता. संगमनेर), किरण शांताराम गुंजाळ (कासार दुमाला, ता. संगमनेर), राजेंद्र सीताराम राहणे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून विदेशी दारू, दोन टेम्पो, एक कार व एक दुचाकी असा २० लाख लाख ८० हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-------
फोटो ओळी : ०८ दारू बंदी
उत्पादन शुल्कच्या येथील पथकाने निर्मळ पिंपरी येथे छापा टाकून २० लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली.
-----