सावत्र पित्याने केला मुलाचा खून

By Admin | Updated: May 10, 2017 14:05 IST2017-05-10T14:05:07+5:302017-05-10T14:05:07+5:30

बायकोला पहिल्या नवऱ्यापासून असलेल्या मुलास सभाळण्यास नकार देत सावत्र बापानेच पाच वर्षाच्या मुलास विहीरीत टाकून खून केल्याची घटना पुणतांबा येथे घडली़

The stepfather murdered the child | सावत्र पित्याने केला मुलाचा खून

सावत्र पित्याने केला मुलाचा खून

आॅनलाइन लोकमत
राहाता (अहमदनगर), दि़ १० -
बायकोला पहिल्या नवऱ्यापासून असलेल्या मुलास सभाळण्यास नकार देत सावत्र बापानेच पाच वर्षाच्या मुलास विहीरीत टाकून खून केल्याची घटना पुणतांबा येथे घडली़
मुलाची आई निर्मला वंसत पवार (वय, २५, बहिरोबा मठ, पुणतांबा) हिने राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ या फिर्यादीनुसार निर्मला यांचे पहिले लग्न सुनील श्रीपात गांगुर्डे याच्याशी झाले होते़ लग्नानंतर निर्मला यांना वैष्णवी ही मुलगी व आदित्य हा मुलगा अशी दोन अपत्य झाली़ दरम्यान सात वर्षांनंतर सुनील गांगुर्डे यांनी पत्नी वैष्णवीला सोडून दिले़ पहिला नवरा सोडून गेल्यामुळे निर्मला मुलांसह माहेरी आई-वडिलांकडे जाऊन राहू लागल्या़ त्यानंतर निर्मला यांनी वसंत रोडोबा पवार याच्याशी सात महिन्यापूर्वी दुसरा विवाह केला़ मुलगी वैष्णवी हीला माहेरी आई-वडिलांकडेच ठेवून निर्मला मुलगा आदित्य याला घेऊन वसंत पवार यांच्या घरी नांदायला गेली़ दरम्यानच्या काळात वसंत याने निर्मला यांच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलाला सांभाळण्यास नकार दिला़ या मुलावरुन तो निर्मलाशी वाद घालू लागला़ १ मे रोजी वसंत रोडोबा पवार याने निर्मला यांचा मुलगा आदित्य गांगुर्डे हा घराबाहेर झोपला असताना त्याला उचलून नेऊन विहिरीत टाकून मारले़ निर्मला यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वसंत रोडोबा पवार याच्यावर गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे़ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप दहिफळे करीत आहेत़

Web Title: The stepfather murdered the child