शेवगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST2021-02-21T04:40:38+5:302021-02-21T04:40:38+5:30
शेवगाव : जुन्या पंचायत समिती इमारतीच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे स्थलांतर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर ...

शेवगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार
शेवगाव : जुन्या पंचायत समिती इमारतीच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे स्थलांतर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात येणार आहे. तालुक्यातील शिवप्रेमींची अनेक दिवसांपासून असलेली मागणी पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली आहे. शुक्रवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या हस्ते पुतळा स्थलांतरित करण्यात येणाऱ्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील, गटविकास अधिकारी महेश डोके, पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात, गंगा पायघन, बाजार समितीचे संचालक संजय कोळगे, भाऊराव भोंगळे आदी प्रमुख उपस्थित होते. शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी समक्ष भेटून व पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला.
---
२० शेवगाव पुतळा